Tulip Garden : श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन 19 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यासाठी परदेशातून पाहुणे तसेच दुबईतील गुंतवणूकदारही सहभागी झाले होते. काश्मीरचे पर्यटन देश-विदेशात पोहचवण्यासाठी परदेशी पाहुण्यांना निमंत्रीत करण्यात आल्याची माहिती मनोज सिन्हा यांनी दिली. ट्युलिप गार्डनमध्ये विविध जातींच्या 16 लाखांहून अधिक ट्युलिप्स फुलतील असे ते म्हणाले. शिवाय गेल्या वर्षी 15 लाख ट्यूलिप फुलल्याचीही त्य़ांनी माहिती दिली.















