नवी दिल्ली :
वरिष्ठ आयएएस अधिकारी तुहिन कांत पांडे यांना नवे वित्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ओडिशा कॅडरचे 1987 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी तुहिन कांत हे सध्या गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापक विभागाचे सचिव आहेत. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने पांडे यांना वित्त सचिव म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे. मागील महिन्यात कॅबिनेट सचिव म्हणून टी.व्ही. सोमनाथन यांची नियुक्ती करण्यात आल्यापासून हे पद रिक्त होते. परंपरेनुसार केंद्रीय वित्त मंत्रालयातील सर्वात वरिष्ठ सचिवाला वित्त सचिव म्हणून नियुक्त केले जाते.









