6 कर्मचारी ठार, गॅस पाईपलाईन लक्ष्य करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) सरकारी मालकीच्या गॅस कंपनीचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात किमान सहा कर्मचारी ठार झाले असून दहाहून अधिक लोक जखमी झाले. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिह्यातील कोट लालूजवळ बंदी घातलेल्या टीटीपीच्या दहशतवाद्यांनी सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाइन कंपनीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांवर गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत किमान आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दहशतवाद्यांनी गॅस पाईपलाइन प्रकल्पाला लक्ष्य करण्याचा कट रचत होता. जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांना उपचारासाठी डेरा इस्माईल खान येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









