वृत्तसंस्था/ माद्रिद
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रिद खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रशियाच्या चौथ्या मानांकित मेदव्हेदेवचे आव्हान चौथ्या फेरीतच रशियाच्या कॅरेटसेव्हने संपुष्टात आणत उपांत्यपूर्व गाठली. तर ग्रीकच्या सित्सिपसने स्पेनच्या बायेझवर मात करत पुढील फेरीत स्थान मिळवले.
मंगळवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात रशियाच्या अॅसलेन कॅरेटसेव्हने आपल्याच देशाच्या तृतीय मानांकित मेदव्हेदेवचा 7-6(7-1), 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात ग्रीकच्या सित्सिपसने सेबेस्टियन बायेझचा 7-5, 3-7, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. कॅचेनोव्हने रुबलेव्हचा 7-6 (10-8), 6-4 असा फडशा पाडत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.









