वृत्तसंस्था/ माद्रिद
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रिद खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सिपसने ऑस्ट्रेलियाच्या डॉम्निक थिएमचा पराभव करत एकेरीची तिसरी फेरी गाठली. तर रशियाच्या तृतीय मानांकित मेदव्हेदेवने वेव्हासोरीचा पराभव तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात ग्रीकच्या सित्सिपसने ऑस्ट्रियाच्या थिएमवर 3-6, 6-1, 7-6(7-5), सेबेस्टियन बाझने मार्कोस गिरॉनचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. सित्सिपस आणि बाझ यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. रशियाच्या तृतीय मानांकित मेदव्हेदेवने वेव्हासोरीचा 6-4, 6-3, रशियाच्या शेवचेंकोने लिहेकाचा 6-1, 6-1, सर्बियाच्या लेजोविकने कॅनडाच्या अॅलिसीमेचा 6-2, 3-6, 7-6(7-5) असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.









