वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
येथे सुरू असलेल्या बीएनपी पेरीबस खुल्या इंडियन वेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात ग्रीकचा सित्सिपेस आणि रॉबर्टो अॅग्युट त्याचप्रमाणे महिला विभागात बेलिंडा बेन्सिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्सनने ग्रीकच्या द्वितीय मानांकित स्टिफॅनोस सित्सिपेसचा 7-6(7-0), 4-6, 7-6(7-5) असा पराभव तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. स्पेनच्या अॅग्युटला दुसऱ्या फेरीतील सामन्यात इमेल रुसुव्होरीने 7-6 (7-5), 6-2 असे पराभूत करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे जेसन कुबलेरने हा सामना 2-6, 7-6 (7-5), 3-0 असा जिंकून पुढील फेरीत स्थान मिळवले. नॉर्वेच्या तृतीय मानांकित कास्पर रुडने दियागो शुवार्त्जमनचा 6-2, 6-3, ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीने तैवानच्या लिनचा 6-2, 6-4 इलिया इव्हाशेकाने झेंडस्कल्पचा 7-5, 3-2, क्रिस्टियान गॅरीनने निशिओकाचा 6-4, 6-0 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. दुखापतमुळे झँडस्कल्पने सामना अर्धवट सोडला.
महिलांच्या विभागात साबालेंकाने रॉडीनाचा 6-2, 6-0, अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने क्रिस्टिना ब्युकेसाचा 6-2, 6-4, जिल टिचमनने बेलिंडा बेन्सिकचा 3-6, 6-3, 6-3, सुरेंकोने वेकिकचा 2-6, 6-2, 6-2, अकराव्या मानांकित कुडेरमेटोव्हाने ब्लिनकोव्हाचा 6-3, 6-4, सहाव्या मानांकित क्रेसिकोव्हाने येस्ट्रेमेस्काचा 6-1, 6-2, सेसनोव्हिचने ओस्टापेंकोचा 7-5, 3-6, 6-2 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले. झेंग शुईने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने रिबेका पिटरसनला पुढील फेरीत चाल मिळाली.