दांडा शिवोलीतील नवीन फुटबॉल मैदानाचे उद्घाटन
वार्ताहर /शिवोली
भविष्यात युवकांसाठी अनेक मोठ्या योजना राबविण्यात येणार आहेत. शिवोली मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नरत आहे. येथील फ्ggढटबॉल खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मैदानाचा युवकांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन आमदार डिलायला लोबो यांनी केले. दांडा शिवोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या फुटबॉल मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार लोबो बोलत होत्या. त्यांच्याहस्ते फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्ना पंचायतीच्या पंचसदस्य शर्मिला वेर्णेकर, शिवोली भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विनय वायंगणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. दांडा शिवोली येथे फ्gढटबॉल खेळाडूंसाठी मैदान बांधून दिले जाईल, असे आश्वासन निवडणुकीच्यावेळी दिले होते. ते आता पूर्ण झाले आहे. या मैदानाचा स्थानिकांनी वापर करावा, असे आमदार लोबो यांनी सांगितले.









