उन्हाळा सुरू होताच चेहरा उन्हामुळे काळवंडतो.उष्णता, धूळ आणि घामामुळे त्वचेची चमक जाऊन त्वचेवर पुरळ उठणे, सनबर्न, टॅनिंग, मुरुम आणि एलर्जीसारख्या समस्याही सुरू होतात.पण वेळीच त्वचेची काळजी घेणे गरजेचं आहे.त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी तुळशीचा वापर अनेक प्रकारे करता येतो. उन्हाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी तुळशीपासून बनवलेला फेस पॅक कसा वापरायचा ते जाणून घेऊ या.
त्वचा चमकदार करण्यासाठी कडुनिंब आणि तुळशीचा फेस पॅक उत्तम पर्याय आहे. तुळशी आणि कडुलिंब त्वचेवर असलेले बॅक्टेरिया साफ करून चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुळस आणि कडुलिंबाच्या पानांचे समान भाग बारीक करून चेहऱ्याला लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा. तुमची त्वचा चमकू लागेल.
तुळशी आणि मधाने तयार केलेला हा फेस पॅक त्वचेला हायड्रेट करतो. ते बनवण्यासाठी तुळशीची काही पाने बारीक करून त्यात मध मिक्स करा. साधारण २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुळशीच्या काही पानांना बारीक करा. त्यात गुलाब जलाचे काही थेंब मिक्स करा. सुमारे १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा धुवून घ्या.
(वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









