खानापूर भाजप उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा चुंचवाड येथील मतदारांना भरोसा : प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /नंदगड
आई-वडिलांनी बुद्धी व शिक्षण दिले. परिस्थिती बेताची राहिल्याने शिक्षण घेताना बराच त्रास झाला. पण त्यानंतर हायस्कूल शिक्षक होऊन विद्यार्थी घडवले. सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. शिक्षक म्हणून काम करताना मला महिना लाखभर पगार मिळाला. आज मला बऱ्यापैकी पेन्शन आहे. माझ्या पाठीमागे कोणीही नाही. आता माझ्या जीवनाचा शेवट आहे. माझे कार्य हाच माझा वारसा राहील. त्यासाठी जनतेने आपली मते देऊन मला समाजाची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी आर्त हाक भाजपाचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी चुंचवाड येथील प्रचारादरम्यान झालेल्या जाहीर सभेत दिली. हलगेकर म्हणाले, कक्केरी भागातील शेतवडीतील उसाचे पीक पाण्याअभावी वाळत चालले आहे. मलप्रभा नदीचे पाणी सौंदत्ती डॅमला जाऊन मिळत आहे. त्याचा उपयोग अन्य तालुक्मयांना होत आहे. मलप्रभा नदीचे पाणी प्रथम खानापूर तालुक्मयाला मिळाले पाहिजे. त्यासाठी विशेष योजना मंजूर करून आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सध्या ऊस पिकाला मोठे महत्त्व आहे. आगामी काळात मंग्यानकोप येथे स्वत:चा साखर कारखाना उभा करून या भागातील शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यात येणार आहे. शिवाय येथील शेकडो बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देणार आहे. य् ाावेळी भाजपचे नेते राजू रपाटे, ता. पं. माजी सदस्य मेहबूबसुभानी नदाफ, ज्येष्ठ नागरिक बसप्पा अवरादी, हणमंत शिरगापुर, दशरथ पाटील, वासुदेव पाटील, माऊती हरिजन, जबरअली हलसगी, खंडोबा शिरगापुर, शिवानंद गोधोळी, श्रीकांत पाटील, आप्पाराव पाटील, दशरथ बेंचिकर, शिवा मयेकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









