पांढऱ्या शुभ्र दातांमुळे नेहमीच चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.पण काही वेळा दात पिवळे पडणे हे व्यक्तीसाठी लोकांसमोर लाजिरवाणे ठरू शकते. बऱ्याचवेळेला रोज घासूनही दातांचा पिवळेपणा दूर होत नाही. मग यासाठी अनेक वेळा लोक बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या प्रोडक्टचा वापर केला जातो. परंतु हे प्रोडक्ट्स तोंडाच्या स्वच्छतेसाठी देखील हानिकारक असू शकतात. म्हणूनच आज आपण मोहरी वापरून दातांचा पिवळेपणा कसा दूर करायचा हे जाणून घेणार आहोत.
मोहरीचे तेल आणि मीठ याने दात सहज स्वच्छ केले जाऊ शकते. त्यांचा वापर करण्यासाठी १/२ चमचे मोहरीच्या तेलात १ चिमूट मीठ मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण दातांवर लावा आणि हलक्या हाताने चोळा. हा उपाय रोज केल्याने दातांचा पिवळेपणा सहज निघून जाईल.
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी पिवळ्या मोहरीच्या तेलात अर्धा चमचा हळद मिक्स करा. ही पेस्ट पिवळे झालेल्या दातांवर चोळा. ही पेस्ट रोज वापरल्यास दातांचा पिवळेपणा काही दिवसातच निघून जाईल.
(वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









