रुचकर आणि पित्तनाशक असणारी सोलकढी सर्वानाच आवडते.विशेष करून मांसाहारी जेवणासोबत सोलकढी सर्व्ह केली जाते.सोलकढीमुळे पचनशक्ती देखील सुधारते. आज आपण आंबट गोड चवीची सोलकढी कशी बनवायची हे जाणून घेऊयात.
साहित्य
१ नारळ
१५ ते २० आमसूलच्या पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
पाणी
लसून पाकळ्या
१ चमचा आल्याचे तुकडे
१ चमचा काळं मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
सर्वात आधी आमसूल पाण्यामध्ये भिजवून ठेवा. यांनतर एक नारळ फोडून खोबऱ्याचे काप करून घ्या अथवा नारळ खवून घ्या. मिक्सरमध्ये तुम्ही खवलेले खोबरे अथवा काप पाणी घालून वाटून घ्या. मात्र हे वाटताना त्यामध्ये तुम्ही मिरची,आलं आणि लसूण घाला.आणि थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
आता नारळाचा चव सुटी कापडामधून गाळून घ्या. पूर्ण नारळाचे दूध गाळून येईपर्यंत तुम्ही कपड्यामध्ये असे दोन ते तीन वेळा पाणी मिक्स करून नारळाचे दूध काढा. त्यानंतर भिजत घातलेले आमसूल घ्या आणि त्याचे आगळ करून घ्या (तुम्हाला हे करण्याइतका वेळ नसेल तर तुम्ही बाजारातून तयार आमसुलाचे आगळही आणून त्याचा उपयोग करू शकता)हे आगळ तुम्ही नारळाच्या दुधात मिक्स करा. त्यात अगदी चिमूटभर काळं मीठ आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्या. यांनतर एका लहान कढईत तेल घ्या. त्यात जिरे तडतडल्यानंतर सोलकढीला वरून फोडणी द्या आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करा.तयार चविष्ट सोलकढी मांसाहारी किंवा शाकाहारी जेवणासोबत सर्व्ह करा.
Previous Articleफोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला
Next Article कोल्हापुरच्या व्यावसायिकाला पुणेरी भामट्याने गंडवले









