Hairstyle:उन्हाळ्यात गरमीमुळे शक्यतो केस सांभाळणे खूप अवघड जाते. अशावेळी आपल्याला हवी ती हेअर स्टाईल ही करता येत नाही. कारण केसात सर्वाधिक घाम येतो. पण आज आपण काही हेअरस्टाइल सांगणार आहोत, जे स्टायलिश लूकसोबतच गरमीचा त्रासही होऊ देणार नाही. चला बघुयात कोणत्या आहेत या हेअरस्टाईल.
पोनीटेल
या स्टाईलमध्ये केस अगदी वर बो किंवा स्क्रनचीने बांधून खाली मोकळे सोडले जातात. केसांना स्टायलिश बनवणारी ही स्टाइल उष्णतेपासूनही बर्याच प्रमाणात संरक्षण करते. यासोबतच ही हेअरस्टाईल लूकला आकर्षक बनवेल.
स्लीक बन
या हेअरस्टाईलमध्ये, डोक्याच्या अगदी वर एक अंबाडा (बन) बनविला जातो. यामध्ये केस घट्ट बांधले जातात जेणेकरून ते पसरू नयेत. त्यामुळे उष्णता कमी होते आणि तुम्ही काळजी न करता तुमचे काम पूर्ण करू शकता. उन्हाळ्यात या हेअरस्टाईलमुळे महिलांना हलके वाटते हे अनेक हेअरस्टाइलिस्टांनी मान्य केले आहे.
मेस्सी बन
उन्हाळ्यात लांब केसांमुळे जास्त गरमी जाणवते. अशावेळी तुम्हीउन्हाळ्यात मेसी बन हेअरस्टाईल कॅरी करू शकता. ही हेअरस्टाईल कॅरी करणे देखील सोपे आहे. मेसी बन हेअरस्टाईल कुर्त्यापासून ते वेस्टर्न टॉप पर्यंत सगळ्यांवर शोभून दिसते.
Previous Articleमहोब्बत कि दुकान खुल गई…भांडवलदारांबरोबरची दोस्ती लोकांच्या शक्तीपुढे हरली- राहुल गांधी
Next Article जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेत रसिका परब प्रथम









