संध्याकाळच्या वेळी जर काही चटपटीत खायची इच्छा होत असेल तेही घरच्या घरी मग कच्च्या केळीची भजी उत्तम पर्याय आहे.ही भजी खूप चविष्ट असतात. कांदा भजी,मिरची भजी ,बटाटा भजी हे नेहमीचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन रेसिपी ट्राय करून बघू शकता. ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
साहित्य
कच्ची केळी – २
बेसन – १ कप
लाल तिखट – १ टीस्पून
हिंग – १/४ टीस्पून
जिरे पावडर – १ टीस्पून
चवीनुसार मीठ
पाणी – अर्धा कप
कृती
सर्व प्रथम केळी सोलून घ्या. त्यानंतर त्यांचे लहान तुकडे करा.आता दुसऱ्या भांड्यात लाल तिखट, बेसन, धनेपूड, मीठ, हिंग आणि जिरेपूड घालून मिक्स करा.
त्यात पाणी घाला. त्याचे जाड मिश्रण तयार करा. आता काढई गॅसवर ठेवा. त्यात तेल टाकून गरम करा. या पिठात केळीचे तुकडे टाका. या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता हे मिश्रण गरम तेलात थोडं थोडं टाका. भजी सोनेरी होईपर्यंत तळा. आता त्यांना तुमच्या आवडीच्या हिरव्या किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









