शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसात बरेच जण उपवास करतात. अशावेळी दररोज काय खायचं हा प्रश्न पडतो.म्हणूनच आज आपण उपवासाची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. तांदळाचे घावणे तर आपण सर्वांनीच खाल्ले आहेत. पण उपवासाचे घावन हा एक वेगळा पदार्थ तुम्हाला करता येऊ शकतो.
साहित्य:
एक वाटी वरीचे तांदूळ
एक वाटी साबुदाणे
2 हिरव्या मिरच्या
ओले खोबरे
शेंगदाण्याचा कूट
जिरे
चवीपुरते मीठ
तूप
कृती :
वरी तांदूळ आणि साबुदाणा एकत्र रात्रभर भिजवा. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर सकाळी मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या. हे वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, शेंगदाण्याचा कूट, मीठ सर्व मिक्स करावे. नेहमीच्या घावनाप्रमाणेच हे सारण सरसरीत करावे नॉनस्टिक तव्याला तूप लावा आणि घावन पसरवा आणि मग भाजून घ्या. खोबऱ्याच्या चटणीसह तुम्ही हे घावन सर्व्ह करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









