तरुणभारत ऑनलाइन
बाहेर जेवायला गेल्यानंतर राईस बरोबर डाळ तडका हे समीकरण ठरलेलंच असतं. जे बऱ्याच लोकांना खायला आवडतं.पण घरच्या घरी हा डाळ तडका झटपट बनवता येतो ज्याची चव देखील परफेक्ट ढाबा स्टाईलदेखील असेल. चला तर मग जाणून घेऊयात याची रेसिपी.
साहित्य
शिजवलेली तूरडाळ,बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो ,कोथिंबीर,हळद ,तिखट,मीठ ,हिंग , मोहरी, तेल ,तूप ,वाळलेल्या मिरच्या आणि पाणी
कृती
कुकरमध्ये डाळ शिजवून घ्या. नंतर एका पातेल्यात १ टेबलस्पून तेल तापवून हिंग-मोहरीची फोडणी करा. कढीपत्ता पाने घाला.
मग कांदा परता. कांदा गुलाबी झाला कि टोमॅटो घाला. हळद, तिखट घाला आणि तेल सुटे पर्यंत परता.
मग शिजवलेली डाळ घोटून घाला. कोथिंबीर, मीठ घालून १ उकळी काढा. गरज वाटल्यास १/४ कप पाणी घाला. जास्ती पाणी घालू नका. डाळ तडका जरा जाडसरच चांगला लागतो.हे मिश्रणाची पुन्हा चांगली उकळ काढा.
यानंतर फोडणीच्या कढईत तेल किंवा तुप गरम करून आधी जिरे मग लसूण बारीक चिरून घाला. लसूण ब्राऊन झाली कि मग वाळलेल्या लाल मिरच्यांचे २ तुकडे आणि गरजेनुसार तिखट घाला. आणि डाळीला वरून हा तडका द्या.अशाप्रकारे ढाबा स्टाईल तडका तुम्ही जिरा राईस सोबत सर्व्ह करू शकता.









