सकाळच्या नाश्त्यातपोहे, उपमा, शिरा असे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पोह्यांपासून बनवलेली टेस्टी पोहे कचोरी नक्कीच ट्राय करू शकता. याची रेसिपीही सोपी आहे. यानुसार तुम्ही झटपट क्रिस्पी आणि चविष्ट कचोरी बनवू शकता. आज आपण हि कचोरी कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
साहित्य
२ उकडलेले बटाटे
४-५ ब्रेडचे तुकडे
१ चमचे चिली फ्लेक्स
१/२ कप भिजवलेले पोहे
१/२ लिंबू,
१/४ वाटी क्रश भाजलेले शेंगदाणे
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची
१/२ इंच बारीक चिरलेले आले
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
२ चमचे घट्ट दही
तेल
चवीनुसार मीठ.
कृती
पोहे कचोरी बनवण्यासाठी प्रथम बटाटे एका भांड्यात स्मॅश करा. आता ब्रेड स्लाइसचे लहान तुकडे करा आणि बटाट्यांमध्ये घाला. यानंतर वरून चिली फ्लेक्स आणि मीठ घाला. आता हे मिक्सर हाताने चांगले मिक्स करून मऊ पीठ तयार करा. यानंतर दुसऱ्या भांड्यात पोहे घेऊन सारण बनवा.आता त्यात शेंगदाणे, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, आले, दही, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करा. आता बटाटे हाताने पसरवा. त्यात पोह्याचे सारण भरून ते बंद करून बटाट्याला टिक्कीचा आकार द्या. यानंतर कढईत तेल गरम करून सर्व टिक्की तेलात एक एक करून तळून घ्या. तुमची पोहे कचोरी तयार आहे. आता टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









