तुम्ही नाश्त्यात कधी ना कधी आप्पे खाल्लेच असतील.आप्पे हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या आवडीने खाल्ला जातो. साधारणपणे आप्पे रव्यापासून किंवा तांदळापासून बनवले जातात पण तुम्हाला माहीत आहे का की बेसनापासूनही आप्पे सहज बनवता येतात.बेचला तर मग जाणून घेऊया अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी बेसनाच्या आप्पेची सोपी रेसिपी.
साहित्य
1/2 कप बेसन
२ चमचे रवा
1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेली सिमला मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर
1 टेबलस्पून
1/2 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून हळद पावडर
1 टीस्पून दही
चवीनुसार मीठ
आप्पे बनवण्यासाठी प्रथम बेसनमध्ये दही घालून चांगले मिक्स करावे. यांनतर त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घट्टपणा कमी करा आणि आता या बेसनाच्या मिश्रणात मीठ, तिखट आणि बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची घालून सर्व मिश्रण एकत्र करा. आणि शेवटी त्यामध्ये इनो घालून चांगले मिक्स करा. आता आप्पे पॅनच्या प्रत्येक साच्यात तयार केलेले पीठ घाला.मंद आचेवर 2 मिनिटे अप्पे झाकणाने झाकून ठेवा.आता प्रत्येक आप्पे थोडेसे तेल लावून उलटे करा.
त्यांना थोडा वेळ शिजू द्या, नंतर हे आप्पे पॅनमधून काढा आणि टोमॅटो सॉससह गरम सर्व्ह करा.









