उग्र वासामुळे मुळ्याची भाजी सहसा कोणाला आवडत नाही.लहान मुले ही भाजी खाणे टाळतात.अशावेळी जर मुळ्याचे पराठे केले तर हे पराठे सर्वाना नक्कीच आवडतील.मुलेही हे पराठे आवडीने खातील.शिवाय जेवणाच्या डब्यामध्ये देण्यासाठी चांगला पर्याय आहे.चला तर मग आज जाणून घेऊयात हे पराठे कसे बनवले जातात.
साहित्य :
गव्हाचे पीठ- २ वाट्या
२वाट्या किसलेला मूळा,
मीठ
साखर- अर्धा चमचा
तिखट
गरम मसाला – १ चमचा
बेसन पीठ – ३चमचे
तेल
जिरे-मोहरी
हिंग
हळद
पाणी.
कृती :
सर्वप्रथम कणिक सैलसर मळून घ्या.मळलेली कणिक ओल्या कापडाने झाकून ठेवा. एका सालकाढणीने मूळ्याचं बाहेरचा भाग स्वच्छ करून घ्या. मग मूळा खिसून घ्या.यांनतर एका कढईमधे थोडं तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी टाका.मोहरी तडतडली की त्यात पाव चमचा हिंग, हळद टाका. यानंतर त्यात किसलेला मूळा टाकून मूळा चांगला परतून घ्या. ४-५ मिनिटं मध्यम आचेवर मूळा परतून घ्या.आणि १-२ मिनिटे झाकण ठेवून मूळा चांगला शिजू द्या.
आता त्यात चवीनुसार तिखट, मीठ गरम मसाला आणि थोडीशी साखर घालून परता. (साखरेमूळे मूळ्याचा उग्रपणा कमी होतो.) या मिश्रणाला दाटसरपणा येण्यासाठी त्यात २-३ चमचे बेसन पीठ घालून २-३ मिनिटं परतून घ्या. मग हे तयार झालेले सारण एका ताटलीत काढून गार होऊ द्या. यांनतर कणकेच्या छोट्या गोळ्यामध्ये हे सारण भरा. आणि मग त्याचा पराठा लाटा. हा पराठा तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. खोबर्याची ,शेंगदाण्याची किंवा लसूणाची चटणी तसेच दह्यासोबत देखील हा पराठा तुम्ही सर्व्ह करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









