रोज रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला कि आपण इडली, डोसा असे पदार्थ बनवत असतो. पण कधी कधी ते पदार्थ खाऊनही कंटाळा येतो अशावेळी उत्तपम हा बेस्ट पर्याय आहे. हे बनवायला खूप सोपे आहे, तुम्ही कोणत्याही चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता. शिवाय झटपट देखील बनते.आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य
रवा
दही
मीठ
मोहरी
शिमला मिरची
हिरवी मिरची
कांदा
टोमॅटो
तेल
कृती
उत्तपम बनवण्यासाठी तुम्ही प्रथम एका भांड्यात रवा काढा आणि नंतर त्यात दही घाला. किमान १५ मिनिटे ठेवा. यासाठी आंबट दही वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे उत्तपमला छान आंबटपणा येतो. जोपर्यंत रवा भिजत आहे तोपर्यंत सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. आता सर्व भाज्या रव्याच्या बॅटरमध्ये टाका आणि कढईत तेल गरम करा. नंतर त्यात मोहरी तडतडल्यावर ते बॅटरमध्ये टाकून मिक्स करा. यासोबतच त्यात मीठही टाका. आता उत्तपमचे पीठ तयार आहे. तवा गरम करुन त्यावर बॅटर टाकू थोडे जाडसर पसरवा. उत्तपम चांगले भाजून घ्या. नारळाच्या चटणी किंवा सांबार बरोबर सर्व्ह करा.
Previous Articleघरच्या घरी बनवा खोकल्यावर प्रभावी असणारी आल्याची कँडी!
Next Article जाणून घ्या कीवी खाण्याचे हे फायदे









