आपल्यापैकी बर्याच जणांना मखाना म्हणजे काय हे देखील माहित नसेल किंवा पाहिले असेल पण त्याचा नक्की उपयोग काय केला जातो हे माहित नसेल पण पॉपकॉर्न सारखे पांढर्या रंगाचे वजनाने अतिशय हलके असलेले हे मखाने सध्या डाएट मध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. पण मखाना खाल्ल्याने फकत वजनचं नियंत्रणात राहत नाही तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक लाभदायक फायदे आहेत.यापासून अनेक पदार्थही केले जातात. आज आपण मखान्याचा चिवडा कसा बनवतात ते जाणून घेऊयात.
साहित्य
२५० ग्रॅम मखाना
३० ग्रॅम शेंगदाणे
२ चमचे तूप
४ चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
१ चमचा जिरे
अर्धा चमचा हिंग
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
७ ते ८कडीपत्त्याची पाने
१ चमचा आमचुर पावडर
अर्धा चमचा चिवडा मसाला
१ चमचा पिठी साखर
चवीनुसार मीठ
कृती
सर्व प्रथम कढईमधे तूप घालून मखाना मंद आचेवर भाजुन घ्या जेणेकरुन तो कुरकुरीत होईल.आता एका पॅन मधे तेल टाका, तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं हिंग, कडीपत्ता,शेंगदाणे घाला, आणि छान गुलाबी रंग येईपर्यत परतुन घ्या, यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, तिखट, चिवडा मसाला, आमचूर पावडर घालून छान मिक्स करा, आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये भाजून घेतलेला मखाना घाला. यानंतर पुन्हा २ ते ३ मि. परतून घ्या, शेवटी पिठी साखर घाला.गॅस बंद करा, व गार झाल्यावर कुरकुरीत पोष्टीक असा मखाना चिवडा तयार.आवडीनुसार चिवड्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुटस ही घालू शकता.









