आपण दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या काही मसाल्यापैकी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे हळद .अशा या बहुगुणी हळदीचा उपयोग अनेक आजारांवर मत करण्यासाठी होतो .यासोबतच भारतीय संस्कृतीत धार्मिक विधीमध्ये हळदीला महत्वाचे स्थान आहे.आज आपण कच्या हळदीपासून लोणचे कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.
साहित्य
ओली हळद- एक वाटी (कापून)
हिरवी मिरची- अर्धा वाटी
लिंबू रस- अर्धा वाटी
मीठ- चवीपुरते
मोहरी- एक मोठा चमचा
मेथी दाणे – अर्धा चमचा
मोहरी तेल, लोणचे मसाला
कृती
ओली हळद स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे तुकडे करावे. तसेच हिरवी मिरची बारीक कापून घ्यावी.बारीक केलेली हळद,मिरची एकत्र करून मीठ, लिंबूरस टाकून मिसळावे. भाजलेली मोहरी व मेथीदाणे यांची जाडसर पावडर करावी. तेल तापवून थंड करावे. चवीप्रमाणे लोणचे मसाला मिळसून इतर सर्व मिश्रणात हे मिसळावे.काचेची बरणी थोडी तापवून हे मिश्रण नंतर त्यात भरावे. झाकण घट्ट लावून साते ते आठ दिवस उन्हात ठेवावे.
Previous Articleगौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Next Article पेण अपघातात देवगड तारामुंबरी येथील विवाहिता ठार !









