दिवसाची सुरुवात जर भन्नाट नाश्त्यापासून झाली तर आणखीनच मज्जा येते. आज आपण अशीच एक वेगळी आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत.यावेळी तुम्ही नाश्त्यात रवा कचोरीची रेसिपी करून सगळ्यांकडून प्रशंसा मिळवून घेऊ शकता.
साहित्य
एक वाटी रवा, एक ग्लास पाणी, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, दोन उकडलेले बटाटे, एक शिमला मिरची, एक गाजर, कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, आवश्यक तेल आणि मीठ चवीनुसार घ्या.
कृती
रवा कचोरी बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्या नीट धुवून बारीक चिरून घ्या. आता एका कढईत पाणी गरम करून त्यात चिली फ्लेक्स टाका, नंतर दोन चमचे तेल घाला. यानंतर पाण्यात मीठ आणि रवा टाका. नंतर सर्व पाणी सुटेपर्यंत रवा ढवळत राहा. आता हे रव्याचे पीठ करून बाजूला ठेवा.यानंतर उकडलेले बटाटे मॅश करून त्यात चिरलेली सिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालून चांगले मिक्स करून सारण तयार करा. नंतर रव्याच्या पिठाचा मोठा गोळा घेऊन त्यात एक चमचा सारण भरून कचोरीचा आकार द्या. आता कढईत तेल गरम करून त्यात कचोऱ्या तळून घ्या. तुमची गरमागरम रवा कचोरी तयार आहे. तुम्ही त्यांना चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









