Pancake: आज आपण घरच्या घरी एक झटपट रेसिपी जाणून घेणार आहोत. जी चविष्ट तर आहेच शिवाय करायला एकदम सोपी आहे आणि ही रेसिपी मुलांना देखील आवडणारी आहे.
साहित्य :
२ वाटी मैदा किवा गव्हाचे पीठ,
३ चमचा पिठीसाखर,
१ चमचा बेकिँग पावडर,
अर्धा चमचा बेकिँग सोडा,
३ चमचे तूप,
१ ते दिड वाटी दूध
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
कृती :
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, पिठीसाखर, बेकिँग पावडर आणि बेकिँग सोडा, vanilla, मेल्टेड तुप हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. यानंतर यामध्ये थोडे-थोडे दुध घालून मिश्रण थोडे सैलसर करावे. इडलीच्या मिश्रणाप्रमाणे हे मिश्रण तयार झाले पाहीजे. जास्त पातळ करु नये.आता हे मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवावे. यानंतर मंद आचेवर नॉनस्टीक पॅन वरती थोडेसे तुप लावून घ्यावे, व त्यावर पळीने थोडे-थोडेसे मिश्रण घालावे . आणि थोडेसे पसरावे.एका बाजुने भाजून दुसया बाजूनेही सोनेरी सर भाजून घ्यावे.तयार झालेले स्वादिष्ट पॅनकेक मुलांना नक्कीच आवडतील.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









