पावसाळा सुरू झाला की घराघरात गरमागरम भजीचा बेत आखला जातो. पण जर कांदा, बटाटा, कोबीची भजी खाऊन कंटाळा आला असेल तर मग आपण ओव्याच्या पानांची भजी कशी तयार करायची, याची रेसिपी जाणून घेऊया. ओव्याच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा असतो. सर्दी-खोकला, कफ इत्यादी समस्यांवर घरगुती उपाय म्हणून ओव्याच्या पानांचा उपयोग केला जातो. ओव्याच्या पानांपासून तयार केलेली भजी देखील चविष्ट तसंच आरोग्यासाठी पौष्टिकही आहे.
साहित्य
ओव्याची पाने
बेसन
तांदळाचं पीठ
हळद
तिखट
मीठ
हिंग
कृती
एका मोठ्या बाउलमध्ये बेसन, तांदळाचं पीठ, हळद, ओवा, तिखट, मीठ आणि हिंग मिक्स करा.यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल देखील घाला आणि सर्व सामग्री मिक्स करा. आता पाणी घालून भजीचे पीठ तयार करून घ्या यानंतर कढईत तेल गरम करा. ओव्याचे पण भजीच्या मिश्रणात बुडवून तेलामध्ये तळून घ्यागॅसच्या मध्यम आचेवर भजी नीट तळा. भजी करपणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओव्याच्या पानांची टेस्टी भजी तयार आहे. चहा किंवा कॉफीसोबत तुम्ही भजीचा आस्वाद घेऊ शकता.