भेंडीची भाजी अनेकांना आवडते. आणि ही भाजी अनेक प्रकारे देखील केली जाते. आज आपण अशीच एक खास रेसिपी पाहणार आहोत, जी रेसिपी लंच किंवा डिनरसाठी तुम्ही कधीही बनवू शकता. मसालेदार ग्रेव्ही सोबत भेंडी केली तर जेवणात इतर भाजीची गरज नसते.चला तर मग आज याची रेसिपी जाणून घेऊयात.
साहित्य
भेंडी
१ चिरलेला कांदा
३ चिरलेले टोमॅटो
दही – २ चमचे
लसूण पाकळ्या – ४-५
लवंगा – २-३
दालचिनी – १ इंच तुकडा
तमालपत्र – १
आले – १/२ तुकडा
कसुरी मेथी – १ चमचा
हळद – १/२ चमचा
धने पावडर – १ चमचा
लाल तिखट – १/२ चमचा
हिरवी कोथिंबीर चिरलेली
तेल – आवश्यकतेनुसार
चवीनुसार मीठ
कृती
प्रथम भेंडी धुवा आणि ती पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर कोरड्या सुती कापडाने पुसून टाका. यानंतर, भेंडीचा वरचा भाग कापून वरपासून खालपर्यंत चार लांब काप करा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.यानंतर कढईत थोडे तेल टाकून गरम करा. गरम तेलात तमालपत्र आणि भेंडी घाला आणि काही सेकंद तळा.आणि एका ताटामध्ये कडून घ्या .यानंतर, कांदा-आले पेस्ट आणि टोमॅटो प्युरी तयार करा. आणि तेलामध्ये घाला. यानंतर त्यामध्ये दही, तिखट,मीठ आणि वरील सर्व मसाले टाकून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. यानंतर त्यामध्ये तळलेले भेंडी घाला आणि मिक्स करा आणि शिजवा. ३-४ मिनिटे भाजी शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. चवदार ग्रेव्ही असलेली भेंडी तयार आहे. चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करा.









