उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. डिहायड्रेशन झाल्यास त्याचा गंभीर परिणाम शरीरावर होतो. त्याचसोबत त्वचेवरही स्पष्टपणे दिसून येतो. उन्हामुळे त्वचा निस्तेज, निर्जीव आणि कोमेजून जाते.मग अशावेळी बरेच फेस मास्क ट्राय केले जातात. पण ते तितकं फायदेशीर ठरत नाही. म्हणूनच आज आपण कलिंगडाचा फेस पॅक पाहणार आहोत जो नैसर्गिकरित्या त्वचेला हायड्रेट ठेवतो.कलिंगड हे पाण्याने समृद्ध असलेले फळ आहे.याच्या सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.शिवाय त्वचेलाही याचा नक्की फायदा होतो.आज आपण कलिंगडाचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
कृती
सर्व प्रथम एका भांड्यात दोन ते तीन चमचे कलिंगडाचा पल्प घ्या. कलिंगडाचा पल्पमध्ये एक चमचा मध, चिमूटभर हळद आणि एक चमचा बेसन मिसळून पेस्ट तयार करा. पेस्टमध्ये गुठळ्या पडू देऊ नका. आता हा मास्क चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर, पेस्ट सुकल्यावर, सामान्य पाण्याने आपली त्वचा धुवा. फेसपॅक काढल्यानंतर चेहरा मॉइश्चरायझ करा. हा पॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरून पहा, असे केल्याने तुमचा चेहरा सॉफ्ट होईल.
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यापासून आराम मिळतो. वास्तविक, त्यात लाइकोपीन आढळते जे त्वचेची चमक कायम ठेवते. या फळामध्ये भरपूर पाणी असल्याने ते चेहरा आतून स्वच्छ करते आणि सर्व घाण दूर करते. तसेच त्वचेला आतून मॉइश्चरायझ करते.
(टीप : वरील बातमी ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









