उन्हाळा सुरु होताच आंबट गोड कैरीचे वेध लागते. आणि कैरीपासून बनवलेलं पन्ह हे तर इतर कोल्ड्रिंकपेक्षा टेस्टी आणि आरोग्यदायी असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं कैरीचं पन्हं पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं, हे आज आपण जाणून घेऊयात.
साहित्य
कैरी, गूळ किंवा साखर, वेलची पावडर, पाणी आणि चवीनुसार मीठ.
कृती
सर्वप्रथम कुकरमध्ये कैरी उकडून घ्या. त्यानंतर सालं काढून कैरीचा गर काढून घ्या.
आता कैरीचा गर आणि गूळ एका बाऊलमध्ये चांगलं एकजीव करून घ्या.
त्यात थोडीशी वेलचीपूड टाका.
त्यानंतर हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या.
आता हा कैरीच्या पन्ह्यासाठी लागणारा पल्प तयार झाला. हा पल्प तुम्ही हवाबंद बरणीत भरून फ्रिजमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू शकता.
आता एक ग्ला थंड पाणी घ्या. त्यात दोन टेबलस्पून कैरीचा पल्प घाला. चिमुटभर मीठ टाका. आवडत असल्यास बर्फ टाकून मिश्रण चांगलं हलवून घ्या. कैरीचं थंडगार आंबटगोड पन्हं तयार..
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









