डिनर मध्ये काय बनवायचा हा प्रश्न प्रत्येक घरात असतो.त्यात घरी पाहुणे आले की स्पेशल डिश म्हटलं की बऱ्याच वेळेला पनीर बनवले जाते.पण पनीर करताना त्याचा मसाला,ग्रेव्ही यामुळे खूप वेळ लागतो.पण अशावेळी पनीर भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करू शकता.ही रेसिपी झटपट तर बनतेच शिवाय हेल्थ साठी देखील चांगली असते.
साहित्य
पाव किलो पनीर
२ कांदे (चिरलेले)
१ टोमॅटो (चिरलेला)
१/४ चमचा गरम मसाला
१ चमचा चाट मसाला
१/४ चमचा हळद
१ चमचा मोहरी, जिरं
तेल
मीठ
कृती
सर्वप्रथम एका पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करा.आता यात मोहरी, जिरं टाका. आता यात चिरलेला कांदा टाका आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवा. आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून नीट भाजून घ्या.आता गॅस मंद करून त्यात हळद, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि टोमॅटो सॉस टाकून नीट मिक्स करून घ्या. मसाले नीट परतले की त्यात पनीर स्मॅश करून टाका.आता मंद आचेवर हे नीट शिजू द्या. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भुर्जी मध्ये टोमॅटो सॉस तुम्ही घालू शकता.तयार झालेली गरमागरम पनीर भुर्जी चपाती किंवा रोटी सोबत सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









