प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग काही जण पार्लरची मदत घेतात किंवा महागडे प्रॉडक्ट्स वापरतात.अशावेळी आपला चेहरा आणि केसांचे सौंदर्य तर खुलून येते पण मानेकडे दुर्लक्ष होते. मानेचा काळवटपणा चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवू शकतो. म्हणूनच आज आपण काळी मान उजळण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.
बदाम तेल
बदाम तेलाचे काही थेंब घ्या आणि आपल्या मानेवर मालिश करा. यामुळे मानेचा काळपटपणा दूर होतो.बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि ब्लीचिंग एजंटचे गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचा रंग वाढविण्यास मदत होते.
कोरफड
कोरफडमधील गर मानेला लावल्यानंतर मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे त्वचेमध्ये मेलेनिनचे उत्पादन कमी करण्यास मदत करतात.
बटाटा
बटाटा किसून घेऊन त्याचा रस काढावा. आणि हा रस आपण मानेवर लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा रस मानेला लावा.बटाट्यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे त्वचेचा रंग चांगला करण्यास मदत करतात.
मसूर डाळ
मसूर डाळ रात्री भिवजून घ्या. त्यानंतर सकाळी मिक्सरमधून बारिक करुन घ्या. त्यामध्ये कच्च दूध मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनटांनंतर पाण्याने धुवून घ्या.यामुळे काळवटपणा नक्कीच कमी होऊ शकतो
दही
दह्यामध्ये नैसर्गिक एंजाइम असतात. जे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. मानेवरील काळपटपणा काढण्यासाठी दोन चमचे दही घ्या आणि मानेवर लावा. 15 मिनिटांसाठी ही पेस्ट मानेवर राहूद्या आणि थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठवडाभर सतत मानेवर लावली तर मानेचा काळपट दूर होण्यास मदत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









