उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी अनेक प्रकारचे सरबत आपण पितो. हे सरबत शरीराला थंड ठेवण्यास आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. अनेक सरबत उन्हाळ्यात फक्त थंड ठेवत नाहीत तर अनेक आजारांपासून वाचवण्यासही मदत करतात. पण आपण एक वेगळ्या प्रकारचा सरबत पाहणार आहोत. बडीशेपपासून बनवलेले सरबत दिवसभर तुमचे शरीर थंड ठेवण्यास मदत करेल. चला जाणून घेऊया बडीशेप सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
गोड बडीशेप – १/२ कप
साखर – चवीनुसार
लिंबू – २ टीस्पून
काळे मीठ – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
पुदिन्याची पाने – ३ किंवा ४
बर्फ
कृती
बडीशेप स्वच्छ धुवा. यानंतर, बडीशेप सुमारे २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. २ ते ३ तासांनी बडीशेप पाण्यातून काढून मिक्सरमध्ये टाका. यासोबत साखर, काळे मीठ, पुदिन्याची पाने आणि पाणी घाला. नंतर या सर्व गोष्टी बारीक करा. नंतर एक पेस्ट काढा आणि एका भांड्यात ठेवा. यानंतर त्यात पाणी आणि लिंबाचा रस घाला.यानंतर एका ग्लासमध्ये सरबत घाला आणि आवश्यकतेनुसार त्यात बर्फाचे तुकडे टाका.थंडगार आणि टेस्टी सरबत सर्वाना सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









