जर तुम्ही चायनीज फूड लव्हर असाल आणि तुम्हाला डिनरसाठी काही हलकी आणि झटपट चायनीज रेसिपी हवी असेल तर चिली गार्लिक फ्राईड राईसची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा.पण अनेकदा घरी ही रेसिपी ट्राय करताना रेस्टॉरंटची चव मिळत नाही. पण जर तुम्हाला अशी टेस्ट हवी असेल तर रेस्टॉरंट स्टाईल चिली गार्लिक फ्राईड राईस बनवण्याची सोपी पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य
तांदूळ – २०० ग्रॅम (शिजवलेले)
हिरवे लसूण – १ टीस्पून
चिली सॉस – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार
काळी मिरी – अर्धा टीस्पून
कोबी – अडीच कप
बीन्स – अडीच कप
गाजर – अडीच कप
तेल – २ टीस्पून
कृती
चिली गार्लिक फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल आणि सर्व भाज्या घालून भाजून घ्या. भाजी शिजून मऊ झाल्यावर त्यात तांदूळ घाला. यानंतर काळी मिरी, मीठ, सोया सॉस घालून तांदूळ चांगले मिक्स केल्यानंतर १० ते १५ मिनिटे भात शिजवून घ्या. तुमचा चविष्ट मिरची गार्लिक फ्राईड राईस तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.









