potato vada: वडापाव हा सर्वसामान्यांचा आवडता पदार्थ आहे. दिवसभरात कोणत्याही वेळेला बटाटा वडा आपण खाऊ शकतो. पण आज आपण उपवासाचा वडा कसा केला जातो हे जाणून घेणार आहोत.
साहित्य :
चार उकडलेले बटाटे
एक कच्चा बटाटा किंवा रताळे
किसलेले आले
हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
साखर
मसाला नसलेली चटणी
एक चमचा लिंबूचा रस
शेंगदाण्याचा कूट
खवलेला ओला नारळ
राजगिरा पीठ
शिंगाडा पीठ
कृती
प्रथम ४ हिरव्या मिरच्या,थोडेसे आले व थोडेसे जीरे मिक्सर मधून वाटून घ्या. बटाटे गरम असताना सोलून घ्या व बारीक करा. नंतर ते गार झाल्यावरच त्यात आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कूट, खवलेला ओला नारळ घाला. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर व लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा. एकजीव झालेल्या पिठाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या.यानंतर एका भांड्यात राजगिरा आणि शिंगाड्याचे पीठ एकत्र करून त्यात पाणी घाला. त्यात थोडेसे मीठ तिखट व किसलेला कच्चा बटाटा किंवा रताळे घाला. गॅसवर कढईत तेल गरम करा. आणि त्यातून एक चमचा तेल काढून केलेल्या पिठात टाकून मिक्स करा. नंतर वडे तयार पिठात घोळवून तेलात तळून काढा व गरमागरम वडे खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
Previous Articleचेहऱ्यावरचा काळपटपणा घालवा घरगुती उपायाने; जाणून घ्या टिप्स
Next Article उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा – नारायण राणे









