Summer Saree: उन्हाळा सुरु झाला की सर्वचजण कम्फर्टेबल कपड्याचे पर्याय शोधू लागतो.मग ऑफिस असो पार्टी असो किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असो अशावेळी काय घालायचं असा प्रश्न पडतो.अनेकदा कडक उन्हात, घाम आणि चिपचिप होत असल्यामुळे हवी ती स्टाईल देखील करता येत नाही. पण तुम्हीही जर कम्फर्टेबल स्टाइलच्या शोधत असाल तर या सीझनमध्ये तुम्ही वेस्टर्न कपड्यांऐवजी पारंपारिक कपडे घालू शकता. उन्हाळ्यातील साडी लूक आरामदायी आणि अतिशय स्टायलिश शकतो. आज आपण उन्हाळ्यात कशा प्रकारच्या साड्या नेसायला हव्यात हे जाणून घेऊयात.
कसावू साडी ही पारंपारिक साडी आहे. यामध्ये तुम्हाला साध्या आणि डिझायनर अशा दोन्ही प्रकारच्या साड्या मिळतील. बहुतेक करून साड्या पांढऱ्या रंगाच्या असतात. या साड्यांवर तुम्ही कोणताही ऑपोसिट मॅचिंग ब्लाउज घालू शकता. या साड्यामध्ये तुम्हाला गरम देखील होणार नाही.
लिननच्या साड्या उन्हाळ्यात आरामदायी पर्याय असू शकतात.या साडीवर तुम्ही स्लीव्हलेस ब्लाउजही कॅरी करू शकता. उन्हाळयासाठी हि बेस्ट साडी आहे. शिवाय ही साडी स्टायलिश लुकही देते.ऑफिससाठी तुम्ही ही साडी वापरायला काहीच हरकत नाही.
उन्हाळ्यात तुम्ही तुम्हीही कॉटन फ्लोरल साडी ट्राय करू शकता. उन्हळ्यात अशा प्रिंट्स फार ट्रेंड मध्ये असतात.
लाईट सिल्क साडी देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते. असो, पारंपारिक पोशाख प्रत्येक हंगामात सदाबहार असतो.उन्हाळ्यात लग्नसमारंभात ही साडी नक्कीच चांगला पर्याय ठरू शकते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









