RajyaSabha Monsoon Session : राज्यसभेत गैरवर्तन केल्यामुळे तृणमूल काँग्रेसचे खा. डेरेक ओब्रायन यांना निलंबित करण्य़ात आहे. पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे. अध्यक्ष जगदीप धनकड यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. राज्यसभेचं कामकाज आज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं
राज्यसभेच्या अधिवेशनात निलंबित होणारे डेरेक ओब्रायन हे दुसरे खासदार आहेत. याआधी आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांना निलंबित करण्यात आलेलं होत. आणि आता डेरेक ओब्रायन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काल दिल्ली विधेयकावर चर्चा सुरु असताना ओब्रायन आक्रमक झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता.तेव्हाही त्यांना समज देण्यात आली होती. दरम्यान आज अध्यक्ष धनकड यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतले.आम्हाला बोलू देत नाही.सत्ताधारी पक्षाचे नेते गैरवर्तन करतात तेव्हा नेत्यांना वेळीच थांबवत नाही.यासंदर्भात त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.याचबरोबर इतरही काही मुद्दे उपस्थित केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.









