हेली पराभूत, रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीसाठी निवडणूक
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत चालू वषीं होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत निवडणूक सुरू आहे. याचदरम्यान रविवारी सकाळी साउथ कॅरोलिना प्रांतातील रिपब्लिकन पार्टीच्या अंतर्गत निवडणुकीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळविला आहे. ट्रम्प यांना 60.1 टक्के मते मिळाली तर भारतीय वंशाच्या निक्की हेली यांना 39.2 टक्के मते प्राप्त झाली. दुसरीकडे डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रायमरी निवडणुकीत अध्यक्ष जो बिडेन यांनी विजय मिळाला होता. बिडेन यांना 96.3 टक्के मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले डीन फिलिप्स यांना केवळ 2 टक्केच मते मिळू शकली.
अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. यापूर्वी रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पार्टीकडून अध्यक्षीय उमेदवार निश्चित केला जात आहे.
साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर राहिलेल्या निक्की हेली यांनी प्रायमरी निवडणुकीनंतर हार मानणार नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वी आयोवा आणि न्यू हॅम्पशायर प्रांतात झालेल्या निवडणुकीतही ट्रम्प यांनीच विजय मिळविला होता. यानंतर विवेक रामास्वामी आणि रॉन डी-सेंटिस यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.









