वॉशिंग्टन
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब आणि मध्यपूर्व क्षेत्रासाठीचा सल्लागार म्हणून मसाद बूलॉस यांची निवड केली आहे. मसाद हे ट्रम्प यांच्या कन्या टिफनीचे सासरे आहेत. तसेच मसाद हे लेबनॉनी वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. तर ट्रम्प यांनी यापूर्वी चार्ल्स कुशनर यांची फ्रान्समधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. चार्ल्स हे ट्रम्प यांची ज्येष्ठ कन्या इवांकाचे सासरे आहेत









