दक्षिण सोलापूर :
“संसारात राहून परमार्थ साधणे, हेच खरे जीवनसुख आहे,” असे प्रतिपादन मेघराज साधक आश्रम, औराद येथील मठाधीश परमपूज्य बसम्माताई महास्वामीजी यांनी केले.
प.पू. स्वामीजी म्हणाल्या, “‘जे का रंजले गांजले, त्यासी मणे आपुले’, या तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगितल्याप्रमाणे, आपण देव शोधत असाल, तर तो तिथेच सापडतो जिथे दुःखी, गरजू, रंजले-गांजले लोक असतात. संसारात राहूनच परमार्थ साधता येतो.”
श्रावण मास समाप्तीच्या निमित्ताने, मेघराज साधक आश्रम येथे शुक्रवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
- सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा
उद्योगपती निलेश कोळी यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला. त्यांनी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ, वह्या आणि वृक्षारोपण साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
त्याचबरोबर प्रगतिशील शेतकरी महासिद्ध हंडे यांना कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. या दोघांचा मेघराज साधक आश्रमाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे, औरादचे सरपंच शशिकांत बिराजदार, माजी सरपंच यल्लाप्पा कोळी, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी, उद्योगपती मल्लिकार्जुन वाघमोडे, पोलीस पाटील सैपन बेगडे, बोळकवठाचे पोलीस पाटील धर्मराव कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य शाम तेली, तुकाराम सरसंबी, अंगणवाडी सेविका सारिका काळे, सरस्वती बनसोडे, मुकुंद पुजारी, ग्रामपंचायत सदस्य शरणाप्पा कोळी, रवींद्र भंडारे, भक्तावर फकीर, सिद्धाराम कोळी, भिमशा दळवी, श्रीमंत क्षीरसागर, रुक्मिणी चिंचोळे, सुनंदा तेली, विश्वनाथ रुईकर, सावित्री क्षीरसागर, सावित्री देवकते, गंगाबाई कोळी, गैबीपीर येथील सिद्धारूढ मठाचे राजू माशाळकर, शरणाप्पा माशाळकर, काशिनाथ खेत्रे, देवराज पाटील, कृष्णदेव कांबळे, दत्तात्रय संघटे आदींसह औराद परिसरातील मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.








