मुंबई
फ्लिपकार्टच्या संस्थापकांचे पाठबळ असणाऱया ट्रक्सन टेक्नॉलॉजीस यांचा आयपीओ 10 ऑक्टोबर रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये 12 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. मार्केट इंटेलिजन्स डेटा सर्व्हिसकरीता ही कंपनी आपली सेवा बजावते आहे. आयपीओची किंमत 80 रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 309 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.









