त्रिशूर
केरळच्या त्रिशूरमध्ये मंगळवारी सकाळी एक ट्रक रस्त्याच्या कडेला निर्माण करण्यात आलेल्या तंबूत घुसला आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असृन मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. तर 6 जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. नत्तिका येथील राष्ट्रीय महामार्गानजीक हे लोक तंबू उभारून राहत होते. ही दुर्घटना पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कन्नूर येथून हा ट्रक येत होता, तर ट्रक हा चालकाच्या ऐवजी क्लीनर चालवत होता, त्याच्याकडे परवाना देखील नव्हता. चालक आणि क्लीनर हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते असे पोलिसांनी सांगितले आहे









