मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाच्या मॅनिटोबामध्ये कारबेरी शहरानजीक एक ट्रक अन् बस यांच्यात टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जखमी झाले आहेत. बसमधून 25 जण प्रवास करत होते आणि यातील बहुतांश जण हे ज्येष्ठ नागरिक होते. ही दुर्घटना ट्रान्स-कॅनडा महामार्गावर घडली आहे. मॅनिटोबा शहरापासून दाउफिनच्या दिशेने बस प्रवास करत होती. 10 जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रारंभिक तपासानुसार ज्येष्ठ नागरिकांना नेणारी बस महामार्गावरील मार्गिका ओलांडत असताना ट्रकला धडकली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांब्द्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. कारबेरी, मॅनिटोबा येथून प्राप्त झालेली बातमी अत्यंत दु:खद आहे. स्वत:च्या नातलगांना गमाविलेल्या लोकांबद्दल संवेदना व्यक्त करतो असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.









