राजापूर प्रतिनिधी
गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजापूरहून पाचलला येणारा दुचाकीस्वार गणेश धोंडू गुरव.वय वर्ष 38, राहणार गावं काजिर्डा. व तळवडे गावच्या महिला मीनाक्षी मनोज कलमष्टे, वय वर्ष 30.यांचा पाचल वरून ओणीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ला जोरदार टक्कर दिल्याने दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेल्या महिलेचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाला.
दुचाकी स्वार गणेश गुरव याने हेल्मेट घातल्याने तो या अपघातात वाचू शकला असं घटना पाहिलेल्यांचे म्हणणं आहे. अपघात घटनेची तीव्रता पाहता सदर महिलेने जर हेल्मेट घातले असते तर त्या महिलेचा जीव वाचू शकला असता अशी चर्चा घटनास्थळी ग्रामस्थांमध्ये चालू होती.सदर घटना येळवण बागवेवाडी या ठिकाणी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून या ठिकाणी याआधी देखील अनेक अपघात घडले आहेत. सदर घटनेचा दुचाकीस्वार गणेश गुरव याला देखील गंभीर दुखापत झाली असून त्याला रायपाटण रुग्णालयातून रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
आपण राजापूर हून पाचल च्या दिशेने जातं असताना ओणी येथील येरडवं फाटा येथे सदर महिलेने हात दाखवून मला थांबवूनव पाचल ला नेण्याची विनंती केली असं गणेश गुरुव यांचं म्हणणं आहे.सदर घटनेचा पुढील तपास रायपाटण दूरक्षेत्र पोलीस स्टेशनचे तपासीक कमलाकर पाटील सह पो.कॉ. निलेश कात्रे व पो. कॉ. भिम कोळी पाहत आहेत.









