Kolhapur Road Accident : पुणे-बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सिपिआर रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात कोल्हापूर जवळील उचगाव परिसरात झाला.अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पादचारी रस्ता ओलांडत असताना त्यांना वाचवण्यासाठी येणाऱ्या ट्रकने ब्रेक दाबला.मात्र त्यामागून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक बसली.त्यामुळे ट्रकमध्ये असणाऱ्या ड्राइव्हार आणि अन्य तिघांना जब्बर दुखापत झाली आहे.दोन्ही ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यातील एकजण मयत झाल्याची माहिती समोर येत आहे.तर अन्य तिघांना उपचारासाठी सीपीआर येथे दाखल केले आहे.दरम्यान,अपघातामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अधिक वाचण्यासाठी- Ichalkaranji Crime : शहापूरमध्ये आर्थिक कारणातून तरुणाचा निर्घृण खून
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









