वृत्तसंस्था/ राजकोट
सौराष्ट्रविरुद्ध होणाऱ्या इराणी चषक लढतीसाठी शेष भारत संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाच्या ट्रॉय कुली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इराणी चषकाचा हा सामना येथील एससीए स्टेडियमवर 1 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. 2021 पासून ट्रॉय कुली हे बेंगळूरमधील बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ते भारतीय महिला संघाचे गोलंदाज प्रशिक्षक होते. याशिवाय गेल्या वर्षी भारत अ संघाच्या बांगलादेश दौऱ्यावर संघासोबत गेले होते. टास्मानिया संघाचे माजी वेगवान गोलंदाज असून निवृत्तीनंतर त्यांनी वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून लौकीक मिळविला आहे.









