व्हीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव : एजीआर दंडाविरोधात याचिका दाखल
नवी दिल्ली
अडचणीत असलेल्या व्होडाफोन आयडिया यांनी कंपनीवरील होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी एजीआर दंडाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्रस्त व्होडाफोन आयडियाने दिलासा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेत कंपनीने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने 2019 च्या निकालात कंपनीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम आणि त्याचे व्याज इतके जास्त आहे की ते भरणे कंपनीला खूपच जड जाणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असताना एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. यासोबतच सध्याच्या आर्थिक संकटामुळे स्वत:ला वाचवणे कठीण होत असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.









