10 ऑक्टोबरला चित्रपट झळकणार
‘ट्रॉन : एरेस’ या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. या हॉलिवूड चित्रपटाची प्रेक्षक दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. डिस्नेचा चित्रपट ‘ट्रॉन : एरेस’चा ट्रेलर सोशल मीडियावर खासकरून युट्यूबवर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लाखो ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच हजारो कॉमेंट्स या ट्रेलरच्या व्हिडिओला प्राप्त झाले आहेत. यातील व्हीएफएक्स पाहून प्रेक्षक अत्यंत प्रभावित झाले आहेत.
चित्रपट ‘ट्रॉन : एरेस’वरून प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतातील प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट ‘ट्रॉन’ सीरिजचा तिसरा भाग आहे.









