प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर चौक, बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला वालावलकर कुटुंबीयांकडून ट्रॉली अर्पण करण्यात आली आहे. 1 लाख 20 हजार रुपये खर्च करून ही ट्रॉली तयार करण्यात आली. ती सेवेसाठी अर्पण करण्यात आली.
यावेळी ट्रॉलीची विधिपूर्वक पूजा करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष महेश लगाडे, उपाध्यक्ष संतोष देवर, रमेश काळे, ओम पुजारी, दीपक जाधव, विनायक जाधव, सचिन सुर्वे, महादेव नाईक, सुधीर यादव, अरुण कुलाल, वैभव थबास यांच्यासह वालावलकर कुटुंबीय उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी ट्रॉली दिल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. वालावलकर कुटुंबीयांचे यावेळी आभार मानण्यात आले.









