वृत्तसंस्था / हांगझोयु (चीन)
2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू असलेल्या विश्वटूरवरील फायनल्समध्ये भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांचे महिला दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले.
शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिला दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या नामी मासुयेमा आणि चिहारु शिदाने त्रिशा आणि गायत्री यांचा 21-17, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. हा उपांत्य पूर्व फेरीचा सामना 49 मिनिटे चालला होता. वर्षअखेरीच्या या प्रतिष्ठेच्या अंतिम बॅडमिंटन स्पर्धेत त्रिशा आणि गायत्री ही भारताची एकमेव जोडी पात्र ठरली होती. महिला दुहेरीत चीनच्या शु आणि निंग यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.









