बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित व चव्हाट गल्ली, फुलबाग गल्ली, प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागीय कॅन्टोमेंन्ट स्कूल आयोजित प्राथमिक व माध्यमिक हॅन्डबॉल स्पर्धेत सेंट झेवियर संघाने प्राथमिक विभागात दुहेरी मुकुट तर प्राथमिक विभागात मुलांचे दुहेरी मुकुट तर मुलींच्या गटात कॅन्टोमेंन्टने विजेतेपद पटकावून तालुकास्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. इस्लामिया हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हॅन्डबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीत सामन्यात सेंटझेवियर संघाने सेंटपॉल्स संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात समर्थ भंडारीने व साई शिंदे यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात कॅन्टोमेंन्टने मराठी विद्यानिकेतन संघाचा 3-2 असा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात कॅन्टोमेंन्टच्या योगेश यांनी गोल केले. अंतिम सामन्यात सेंट झेवियरसने कॅन्टोमेंन्टचा 7-1 असा पराभव केला. या सामन्यात समर्थ भंडारीने 5 गोल, झेन मुल्ला आणि साई शिंदे यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर कॅन्टोमेंन्टतर्फे रवीने एक गोल केला. मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने कॅन्टोमेंन्टचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात स्वराजंली पाटीलने एकमेव विजयी गोल केला.
17 वर्षाखालील माध्यमिक गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने कॅन्टोमेंन्ट संघाचा 3-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे स्वयम व्ही.ने 2, अजितने 1 गोल केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंटपॉल्स इस्लामीयाचा 1-0 असा पराभव केला. सेंटपॉल्सतर्फे अॅलनने 1 गोल केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाने सेंटपॉलचा 1-0 असा निसटता विजय केला. या सामन्यात स्वयम व्ही. विजय गोल करून विजेतेपद मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला. मुलींच्या अंतिम सामन्यात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात कॅन्टोमेंन्टने सेंट झेवियर्सचा 1-0 असा पराभव केला. कॅन्टोमेंन्टतर्फे दुर्गा हंडेने एकमेव गोल केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात मराठी विद्यानिकेतने इस्लामियाचा 1-0 असा पराभव केला. मराठी विद्यानिकतेनतर्फे अंकिताने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात कॅन्टोमेंन्ट मराठी विद्यानिकेतनचा 3-1 असा पराभव केला. कॅन्टोमेंन्टतर्फे दुर्गा हंडे, सृष्टी पाटील, कंगना कळसेकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तर विद्यानिकतेनर्फे अंकिताने 1 गोल केला. सामन्यानंतर इस्लामिया स्कूलचे सभासद इक्बाल अहमद किल्लेदार, मुख्याध्यापक आय. एम. पालेकर, मुख्याध्यापक बशीर सावनुर, खलील कोतवाल, प्रकाश बजंत्री, प्रशांत देवदानम, इरफान मुल्ला, नागराज आदी मान्यवरांच्याहस्ते विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून नागराज भगण्णावर, प्रकाश बंजत्री, महेश हागीदाळे, वेदराज यांनी काम पाहिले.









