कणगला: पुणे बेंगलोर महामार्गावर कणगला नजीक टँकर, बोलेरो, माल वाहतूक करणारी वॅन आणि तीन कारचा काल रविवार दि 10 सेप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता उपघात झाला. या अपघातात दोन कार जवळ जवळ 15 फुट दूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या.

तसेच टँकर आणि मालवाहतुक करणाऱ्या वाहना मधोमध बोलेरो वाहन व एक कार, सापडल्याने त्या वाहनांचे बरेच नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने वेळीच बोलेरो वाहनातील एयर बॅग ओपन झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

निपाणी संकेश्वर मार्गावर महामार्ग दुरुस्तीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी रस्ता खोदुन ठेवल्याने वाहनांचा तोल जात आहे. या मार्गावर अनेकवेळा लहान मोठे आपघात होत आहेत. महामार्ग प्राधिकरण विभागाने येथील संथगतीने चाललेले रस्ता दुरुस्ती चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी वाहनचालक आणि येथील ग्रामस्थांनी केली आहे .









