समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कॉंग्रेस शिवाय तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांची सहमती झाल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांषी बोलताना म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सुश्री बॅनर्जी पुढील आठवड्यात बिजू जनता दलाचे प्रमुख ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही भेट घेणार आहेत.
तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे कि, “भाजप मुद्दाम राहूल गांधी यांना विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणुन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या या रणनितीला रोखण्याचा दोन्ही पक्षाकडून प्रयत्न केला जात आहे. राहूल गांधी यांनी लंडनमधील भाषणादरम्यान भारताच्या संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मायक्रोफोन बंद केल्याचा आरोप केला. राहूल गांधींच्या आरोपानंतर त्यांनी माफी मागावी यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यामुळे इतर विरोधी पक्षांना भाजप राहूल गांधींचा वापर करून लक्ष्य करत आहे.”असा आरोप केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राहुल गांधींनी परदेशात केलेल्या भाष्यावर माफीमागेपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही अशी भुमिका घेतली आहे. म्हणजेच भाजप काँग्रेसला पुढे करून संसदेचे कामकाज ठप्प पाडायचे आहे. भाजपला राहुल गांधी विरोधकांचा चेहरा बनवायचा आहे. ज्यामुळे त्यांना मदत होईल.” असे मत सुदिप बंदोपाध्याय यांनी व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








